top of page
Leaves Shadow

​पुस्तकं 

शिक्षणासंदर्भात जे विषय पालकांपर्यंत, शिक्षांकांपर्यंत पोचायलाच हवेत असं वाटतं, त्या विषयावरची पुस्तकं मूलगामी प्रकाशन या छोटेखानी प्रकाशनामार्फत आम्ही वाचकांपर्यंत पोचवत असतो. मराठी वाचकापर्यंत हे विषय पोचावेत अशी इच्छा मनात बाळगून या पुस्तकांची निर्मिती केली आहे. 

पुस्तकं  विकत घ्यायची इच्छा असेल तर:

 

१. आम्हाला thefirstthree.pune@gmail.com या  ईमेल आयडीवर ईमेल करा.

२. आपल्याला कोणती पुस्तकं हवी आहेत ती कळवा. पुस्तकं कोणत्या पत्त्यावर हवी आहेत ते पिन कोडसह  कळवा.

३. आम्ही आपल्याला पुस्तकांचा खर्च व टपालखर्च कळवू. बँकेचे तपशील देऊ.

४. पैसे NEFT ने भरल्यावर आम्हाला तपशील कळवा. (जीपेची सुविधा नाही.)

५. पैसे भरल्यानंतर १० ते १२ दिवसात पुस्तके पोस्ट केली जातील.

मोठ्यांसाठी 'बाळ'भारती​

मोठ्यांसाठी 'बाळ'भारती​

लेखक: सूनृता सहस्रबुद्धे

किंमत: रुपये १२५/- + टपालखर्च

भोवतालचं जग कसं आहे याबद्दल बाळाची समज क्षणोक्षणी आकार घेत असते. अगदी बाळपणी अनुभवायला आलेल्या क्षणांमध्ये, आपलं मोठेपणीचं आयुष्य कसं असणार, याची उत्तरं दडलेली असतात, म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक जरूर वाचायला हवं! बाळासाठी नेमकं काय प्रकारचं वातावरण आपण घडवायला हवं, आपल्या कुठल्या वागण्याचा आपल्या बाळावर कसा परिणाम होतो, रोज उद्भवणारे छोटे छोटे प्रश्न कसे सोडवायचे हे विषय या पुस्तकात सहजतेनं उलगडून दाखवले आहेत .

मुलांची भाषा आणि शिक्षक

मुलांची भाषा आणि शिक्षक

लेखक: कृष्णकुमार

मराठी रूपांतर : वर्षा सहस्रबुद्धे

किंमत: रुपये १२५/- + टपालखर्च

मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेत भाषेच्या दुव्याची जागा कळीची असते. हा दुवा जर कच्चा राहिला, तर मुलांच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट गाठणं कठीण बनतं. मुलं वाचती होताना, लिहिती होताना नेमकं काय काय घडतं याविषयी हे पुस्तक वाचकाला मर्मदृष्टी देतं. भारतातल्या शाळा, खाजगी आणि शासकीय शाळांमधली वंचित मुलं, शिक्षणव्यवस्थेत  भिनलेली संकुचितता, याविषयीचं भान आणि शिकणं  म्हणजे नेमकं काय , ते कसं विकास पावतं, भाषा शिकायला मदत करायची म्हणजे नक्की काय करायचं याबाबतची जाण आणि आस्था यामुळे हे पुस्तक यथार्थतेच्या फार वरच्या पातळीवर पोहोचतं  

अभ्यास-आनंद

अभ्यास-आनंद

लेखक: वर्षा सहस्रबुद्धे

किंमत: रुपये १००/- + टपालखर्च

 वस्तीपातळीवर वस्तीतल्या कार्यकर्त्यांनी वर्ग चालवताना अनेक आव्हानं असतात. जागेची अडचण, निवडकच सामान उपलब्ध असणं, बहुतांश मुलं ही त्यांच्या कुटुंबातली शिकणारी पहिलीच पिढी असणंं अशा आव्हानांसकट काम करताना प्राथमिक शाळेच्या वयोगटासाठी उपयोगी पडतील अशा पन्नास-एक उपक्रमांची तपशीलवार माहिती आणि शिकवण्याच्या विविध पद्धतींशी त्यानिमित्तानी तोंडओळख करून देणारं हे पुस्तक.

टिपिक पॉं भर्र

​टिपिक पॉं भर्र

लेखक: वर्षा सहस्रबुद्धे

किंमत: रुपये ७०/- + टपालखर्च

 

​फुगला टम्, पास की नापास, मी सापडवलं आहे, ​टिपिक पॉं भर्र आणि अशी पानं तशी पानं या पाच गोष्टी या पुस्तकात आहेत. मुलांच्या उपजत वृत्ती, आवडी, क्षमतायांची बूज राखत, त्यांना न्याय देत, त्यांचं आव्हान पेलत  शैक्षणिक अनुभव घडतो तो सकसपणाच्या अधिक जवळ जातो या तत्वाला धरून आखलेल्या शिक्षण अनुभवांचं हे कथन आहे. असे आणखी अनुभव मुलांना देण्याबाबत मार्गदर्शन करणारं 'मोठ्यांचं पान'ही यात आहे.

कलू, सुंगू आणि पगूची गोष्ट​

कलू, सुंगू आणि पगूची गोष्ट​

लेखक: वर्षा सहस्रबुद्धे

किंमत: रुपये २५/- + टपालखर्च

कलू, सुंगू आणि पगू या महाराष्ट्रातल्या एका आदिवासी भागातल्या व्यक्तिरेखा. शहरी मुलांना या पुस्तकातल्या आशयातून आणि चित्रांमधून आदिवासी मुलांच्या जगाची थोडीशी कल्पना यावी असा यामागचा विचार . या नवीन जगाबद्दल तोंडओळख होत असताना, वाचक मुलांच्या व्यक्तिगत संदर्भाला साजेशा काही कृतींचाही या पुस्तिकेत समावेश आहे.

 

bottom of page