top of page
Tropical Flower

आपल्या प्रेमाच्या माणसांना आपण आवडतो का ?
त्यांना आपण हवेहवेसे वाटतो का?
या जगात आपल्याला ​सुरक्षित वाटतं का?

जन्माला आल्यापासून या तीन प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या सभोवातालात सतत शोधत असतो. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काय मिळतात, यावर आपल्याला स्वतःविषयी आणि आपल्या आयुष्याविषयी नेमकं काय वाटतं हे ठरत जातं. The First Three Institute for Child Development ही, हा अवघड विषय संवेदनशीलतेनी अभ्यासण्यासाठी तयार केलेली एक जागा आहे. आपल्या आयुष्यातलं मूल असू देत किंवा आपल्यात दडलेलं लहान मूल असू देत, या दोघांसाठीही आपण बालपणाचा अभ्यास करणारं शास्त्र समजून घ्यायला हवं !

आम्ही कोण
 

Early Childhood Development ही विज्ञानशाखा बाळांचा, लहान मुलांचा विकास नेमका कसा होतो याचा अभ्यास करते. आपला मेंदू कसं काम करतो याविषयी होणारा हा अभ्यास फक्त वैज्ञानिक पुस्तकांमध्ये अडकून न राहता, तो आपल्या वर्गात, अंगणात, जिथे जिथे आपली मुलं बागडतात अशा ठिकाणी पोचायला हवा असं आम्हाला ठामपणे  वाटतं. अर्ली चाईल्डहूड डेवलपमेंट या विषयातल्या वैज्ञानिक संशोधनांनी  आपल्या आयुष्याला स्पर्श करावा असं आम्हाला वाटतं आणि म्हणून हे विज्ञान सामान्य माणसापर्यंत पोचवण्यासाठीचा हा प्रेमळ खटाटोप.

​कामाविषयी

आपल्या 'बाळ'पणाची, आयुष्याच्या सुरुवातीची काही वर्षं आपल्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करू शकतात म्हणजे नेमकं काय,  माणूस म्हणून या जगात वावरताना ज्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं त्याची तयारी बालपणीच होते - ती कशी, आपल्या वागण्याची, वृत्तीची बालपणात दडलेली मुळं कशी शोधायची, आपल्या आयुष्यातल्या, आपल्या समाजातल्या मुलांना सकस बालपण कसं मिळवून द्यायचं या आणि अशा अनेक  प्रश्नांची उत्तरं शोधण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांच्याबरोबर आमची संस्था काम करते.

वैयक्तिक सेशन

​तुम्हाला ज्या विषयाबद्दल आणखी समजून घेण्यात रस आहे असा विषय, किंवा ज्या मुद्द्याबद्दल काही शंका आहेत असा विषय घेऊन वैयक्तिक सेशनमध्ये चर्चा केली जाते. तुमच्या बाळाच्या/मुलाच्या वयानुसार त्याचा विकासाचा टप्पा कसा समजून घ्यायचा, आपण आपली भूमिका चांगल्या पद्धतीने कशी निभवायची याचीही इथे चर्चा करता येते.

गटासाठी सेशन

अर्ली चाईल्डहूड डेवलपमेंट हा विषय खोलात समजून घेण्यासाठी विविध गटांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्यात या विषयाचे क्लिष्ट पैलू सोपे करून, रोजच्या आयुष्याशी जोडून घेऊन समजून घेतले जातात. काही शिबिरंही आम्ही जाहीर करतो, त्याबरोबरीनंच तुमचा काहीजणांचा गट असेल, तर तुम्हाला हव्या त्या विषयावर, तुमच्या सोयीनीही हा अभ्यासवर्ग घेता येतो. 

संस्थांबरोबर काम

सरकारी अधिकारी, अंगणवाडी ताया आणि सुपरवायजर्स, धोरणकर्ते, सामाजिक संस्था, CSRs यांचं बालशिक्षणाच्या क्षेत्रातलं काम अधिक अर्थपूर्ण व्हावं, मर्यादित निधीमधूनही प्रभावीपणे काम व्हावं, कामाची पहाणी करून , मूल्यमापन करून पुढच्या कामाची दिशा ठरवता यावी यादृष्टीनंही इथे डोळस सल्ला दिला जातो. 

Services
bottom of page