कामाविषयी
आपल्या 'बाळ'पणाची, आयुष्याच्या सुरुवातीची काही वर्षं आपल्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम करू शकतात म्हणजे नेमकं काय, माणूस म्हणून या जगात वावरताना ज्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं त्याची तयारी बालपणीच होते - ती कशी, आपल्या वागण्याची, वृत्तीची बालपणात दडलेली मुळं कशी शोधायची, आपल्या आयुष्यातल्या, आपल्या समाजातल्या मुलांना सकस बालपण कसं मिळवून द्यायचं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांच्याबरोबर आमची संस्था काम करते.
वैयक्तिक सेशन
तुम्हाला ज्या विषयाबद्दल आणखी समजून घेण्यात रस आहे असा विषय, किंवा ज्या मुद्द्याबद्दल काही शंका आहेत असा विषय घेऊन वैयक्तिक सेशनमध्ये चर्चा केली जाते. तुमच्या बाळाच्या/मुलाच्या वयानुसार त्याचा विकासाचा टप्पा कसा समजून घ्यायचा, आपण आपली भूमिका चांगल्या पद्धतीने कशी निभवायची याचीही इथे चर्चा करता येते.
गटासाठी सेशन
अर्ली चाईल्डहूड डेवलपमेंट हा विषय खोलात समजून घेण्यासाठी विविध गटांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्यात या विषयाचे क्लिष्ट पैलू सोपे करून, रोजच्या आयुष्याशी जोडून घेऊन समजून घेतले जातात. काही शिबिरंही आम्ही जाहीर करतो, त्याबरोबरीनंच तुमचा काहीजणांचा गट असेल, तर तुम्हाला हव्या त्या विषयावर, तुमच्या सोयीनीही हा अभ्यासवर्ग घेता येतो.
संस्थांबरोबर काम
सरकारी अधिकारी, अंगणवाडी ताया आणि सुपरवायजर्स, धोरणकर्ते, सामाजिक संस्था, CSRs यांचं बालशिक्षणाच्या क्षेत्रातलं काम अधिक अर्थपूर्ण व्हावं, मर्यादित निधीमधूनही प्रभावीपणे काम व्हावं, कामाची पहाणी करून , मूल्यमापन करून पुढच्या कामाची दिशा ठरवता यावी यादृष्टीनंही इथे डोळस सल्ला दिला जातो.