top of page

आमच्याबद्दल

सूनृता सहस्रबुद्धे I Soonrita Sahasrabuddhe

सूनृता सहस्रबुद्धे या अर्ली चाईल्डहूड डेवलपमेंट विषयातल्या तज्ज्ञ आहेत . त्यांनी The First Three Institute for Child Development ही संस्था सुरू केली. 

 

सूनृता सहस्रबुद्धे गेली दहा वर्षे बालशिक्षण व बालहक्क या क्षेत्रात काम करत आहेत. बालशिक्षण व  बालविकास या विषयातले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कॉमनवेल्थ स्कॉलर म्हणून UK मध्ये पूर्ण केलं. आपल्या बाळांना, लहान मुलांना सकस बालपण मिळावं यासाठी त्यांनी भारतात तसेच भारताबाहेरील संस्थांबरोबर अर्थपूर्ण काम केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या एजन्सीबरोबर त्यांनी महाराष्ट्रात काम केलं . तसंच सुदान या राजकीय अस्थिरतेतून जाणाऱ्या देशातल्या लहान मुलांसाठी युनिसेफबरोबर राष्ट्रपातळीवर काम केलं आहे. 'मोठ्यांसाठी बाळ-भारती' या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत. Early childhood development या विषयातलं आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन सामान्य माणसापर्यंत पोहोचावं, यासाठी The First Three Institute for Child Development ही संस्था त्यांनी सुरू केली. आपला मेंदू कसं काम करतो याविषयी होणारा हा अभ्यास फक्त वैज्ञानिक पुस्तकांमध्ये अडकून न राहता, तो आपल्या वर्गात, अंगणात, जिथे जिथे आपली मुलं बागडतात अशा ठिकाणी पोचायला हवा यासाठी ही संस्था काम . 

The First Three Institute for Child Development हा केवळ एक व्यवसाय नाही आहे. लहान मुलांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी आपण काही देणं लागतो, ही जाणीव असलेल्या सगळ्यांसाठी एकत्र जमून अभ्यास आणि कृती करण्यासाठीची  एक संवेदनशील जागा आहे. 

bottom of page